ITI Admission 2015 For SSC Fail, Admission Process
यंदा दहावी नापास विद्यार्थ्यांनाही आयटीआय प्रवेश मिळणार असल्याने 
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही. आयटीआय संस्थेत प्रवेश 
प्रक्रियेची ऑनलाइन सुविधा करण्यात आली असल्याने विद्यार्थ्यांनी याचा लाभ 
घ्यावा.
- अनिल भुते, प्रबंधक, आयटीआय, अकोला  अकोला : औद्योगिक 
प्रशिक्षण संस्थेची (आयटीआय) प्रवेश प्रक्रिया ५ जूनपासून सुरू झाली असून, 
यंदाच्या नवीन शैक्षणिक सत्रात दहावी नापास विद्यार्थ्यांनादेखील 
आयटीआयमध्ये प्रवेश मिळणार आहे. शासनाने घेतलेल्या या निर्णयामुळे दहावी 
नापास झालेल्या विद्यार्थ्यांचे मनोधैर्य वाढणार आहे. 
नुकताच दहावीचा 
निकाल लागला असून, अनेक विद्यार्थी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले आहेत. 
त्यामुळे विद्यार्थी आता विविध क्षेत्रातील अभ्यासक्रम निवडण्यात गुंतलेले 
आहेत. दुसरीकडे नापास विद्यार्थ्यांच्या मोठय़ा गटामध्ये निराशा पसरलेली 
आहे. नापास विद्यार्थ्यांना मुक्त विद्यापीठाचा पर्याय उपलब्ध असला तरी 
फारसे विद्यार्थी याकडे वळत नाही. परिणामी यातील काही विद्यार्थी पुन्हा 
परीक्षेच्या तयारीला लागले आहेत. परंतु,  यंदा नवीन शैक्षणिक सत्रासाठी 
शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत काही अभ्यासक्रमासाठी प्रवेश अर्हतेत 
बदल करण्यात आल्याने दहावी नापास विद्यार्थ्यांनादेखील आयटीआयमध्ये प्रवेश 
मिळणार आहे. या अभ्यासक्रमासाठी मागील वर्षीपर्यंत इयत्ता आठवी उत्तीर्ण 
असणे आवश्यक होते, परंतु शासनाच्या नवीन निर्णयानुसार आठवी उत्तीर्ण 
प्रवेशाची अट काढण्यात आली असून, आता दहावी नापास विद्यार्थ्यांना प्रवेश 
मिळणार आहे. 
या प्रमाणे होणार प्रवेश प्रक्रिया 
नवीन 
शैक्षणिक सत्रासाठी आयटीआयच्या विविध अभ्यासक्रमाच्या ८३८ जागांसाठी प्रवेश
 प्रक्रिया सुरू झाली आहे. ५ जूनपासून नोंदणी प्रक्रियेला प्रारंभ झाला 
असून, २४ जून रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत चालणार आहे. तसेच नोंदणी अर्जाचे 
कन्फर्मेशन ८ जूनपासून सुरू करण्यात आले असून, २५ जून रोजी सायंकाळी ५ 
पर्यंत अर्जांचे कन्फर्मेशन करण्यात येणार आहे. यानंतर २७ जून रोजी 
प्राथमिक गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येणार असून, हीच मेरिट लिस्ट 
असणार आहे. परंतु, या यादीत काही चुका राहिल्यास विद्यार्थ्यांना संस्थेला 
अर्जाद्वारे कळवावे लागणार आहे. यादी दुरुस्त झाल्यावर २९ जून ते २ 
जुलैपर्यंत अभ्यासक्रम निवडण्यासाठी विद्यार्थ्यांना वेळ मिळणार आहे. शेवटी
 ४ जुलै रोजी अंतिम यादी जाहीर होणार असून, प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्या 
फेरीला प्रारंभ होणार आहे. 
No comments:
Post a Comment
Thanks For Visiting www.resultshub.net